by Dwitiya Sonawane
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Language
🇲🇷
Publishing Since
2/22/2021
Email Addresses
1 available
Phone Numbers
0 available
April 11, 2025
संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा आणि दहशत निर्माण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा दूसरा भाग. या episode मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. काय पहाल या दुसर्या भागात ? :- मराठ्यांना मुलुखगिरी ( चौथाई / सरदेशमुखी वसूल ) का करावी लागत होती ? त्याला काही लोक लूट किंवा खंडणी असे चुकीचे नाव का देतात? बाजीराव सेनापती म्हणून कसे होते? निजामाचा स्वभाव कसा होता? निजाम आणि बाजीरावामधला फरक काय? निजाम औरंगजेबापेक्षा श्रीमंत होता? दिल्लीच्या बादशहापासून ते सगळे मोगल सरदार बाजीरावाला का घाबरत होते? भारतात भूमिपुत्रांचा इतिहास कसा आणि का दडपला गेला? इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून घेतला मुघलांकडून नाही.. पालखेडची लढाई ही जगातील सर्वश्रेष्ठ 10 लढायांपैकी एक मानली जाते. या पालखेड लढाईच्या आधी काय परिस्थिती होती? निजाम कसा वागला? पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक -> https://granthpremi.com/products/devyoddha Credits: Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
March 28, 2025
थोरले बाजीराव म्हणजे शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयांचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा ! मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा ! साध्या बाजीगर शिलेदारांतून जयवंत सरदार घडवणारा ! हिंदुस्थानात मराठी फौजा तुफानासारख्या नाचवणारा ! दिल्लीवर धडक मारून बादशाही तख्त त्याने हादरवलं. दख्खनेत दंडेली करणाऱ्या निजामाची नांगी ठेचली. कोकणात लष्कर घालून सिद्दी आणि फिरंग्यांची कंबरडी मोडली. इंग्रजांना धडकी भरवली. शत्रूच्या सामर्थ्य नि शक्तीच्या फळ्या फोडून सर्वत्र मराठ्यांचा दरारा निर्माण केला. केवळ 20 वर्षांच्या अल्प काळात हे मन्वंतर घडवलं. या आणि येणार्या काही episodes मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. विषय आहे थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्व. या पहिल्या भागात आपण खालील मुद्दे कवर केले आहेत : औरंगजेबाचा मृत्यू , छत्रपती शाहू महाराज यांची सुटका, छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी यांचा संघर्ष , मराठी सरदारांची द्विधा मनस्थिती, बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते ही जबाबदारी का दिली गेली? बाळाजी विश्वनाथ यांचा पेशवे म्हणून कार्यकाळ कसा होता ? थोरल्या बाजीरावांनी जेव्हा पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली तो काळ कसा होता? त्याच्या समोर काय आव्हाने होती? या विडियो मध्ये सांगण्याच्या भरात २ तारखा चुकल्या आहेत त्याची दुरूस्ती खालील प्रमाणे : १ ) बाजीराव यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०८ असा सांगितला आहे. तो १८ ऑगस्ट १७०० असा पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे) २) १७ नोव्हेंबर १७०७ अशी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद मिळाल्याची तारीख सांगितली आहे. ती १७ नोव्हेंबर १७१३ अशी पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे) Credits: Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd देवयोद्धा त्रिखंडात्मक कादंबरीच्या दुसर्या सुधारित आवृत्तीचे छपाई काम सध्या सुरू आहे. ही आवृत्ती prebook करण्यासाठी खालील लिंक वापरुन आपली मागणी नोंदवा : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScToia5ck8VBVgM_vgh8OQpsiItU_d3qmcBOjoE19a6WVzbiA/viewform?usp=header पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक -> https://granthpremi.com/products/devyoddha Connect with us: Instagram: https://instagram.com/granthpremi Email: [email protected] #Granthpremi #MarathiPodcasts #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve
March 14, 2025
नचिकेत हे एक उत्तम पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शेकडो लोकांना पॉडकास्ट हा विषय शिकवला आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांना जे सापडले ते सोने होते. त्यामध्ये लोकांना बदलण्याची त्यांच्या mindset वर काम करण्याची ताकत आहे. आणि हे सर्व ग्यान (learnings) त्यांनी "जो जे वांछील" या कादंबरी मध्ये गुंफले आहे. कसा होता "जो जे वांछील" कादंबरी घडण्याचा प्रवास ? स्वप्नांचा पाठलाग करणार्या "अनिकेत" या त्यांच्या कादंबरीच्या नायकाप्रमाणे, त्यांना काय अडचणी आल्या? बोली भाषेतील या पुस्तकाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? कादंबरीच्या प्लॉट ला काही लोके का जज करताएत? या एपिसोड मध्ये, पोर्णिमा या एका पॉडकास्टर ने दुसर्या पॉडकास्टर शी साधलेला संवाद, तो ही पॉडकास्ट मधून जन्मलेल्या पुस्तकासाठी, हे खूप रंजक आहे! Nachiket is a seasoned podcaster and a podcasting coach turned Author! He has interviewed 100+ experts and achievers from different walks of life and coached many podcasting enthusiasts.He has evolved as a human being at a much faster pace compared to others due to his podcasting journey.He has incorporated his self help learnings, experiences and value nuggets from his journey into a fiction called "Jo Je Vanchil" in Marathi language. Pornima a fellow podcaster is talking to him in this episode to understand more about this book and how the book has the capacity to change people by working on people's mindset. "जो जे वांछील" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/jo-je-vanchil Credits: Guests: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Hosts: Pournima Deshpande (IT Professional, Actor, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Produced by: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.
All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.
We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.
While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at [email protected] for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.
By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.