by Swayam Talks
दोन दिवसांच्या मस्त सुट्टीनंतरचा पहिला वार म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे कामाची चिंता, सोमवार म्हणजे काळजीचा गुंता. अशा या Monday Blues पासून दूर घेऊन जात आपल्याला Positive Energy चा एक झक्कास डोस द्यायला येतेय अनघा मोडक एका नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीजमधून. आता प्रत्येक सोमवारी न चुकता ऐका ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या नव्या आठवड्याची सकारात्मक सुरुवात करा. अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो.
Language
🇲🇷
Publishing Since
11/6/2023
Email Addresses
1 available
Phone Numbers
0 available
January 14, 2024
एक IAS ऑफिसर म्हणून विविध गावांची मने ओळखणाऱ्या, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. विविध किस्से सांगत त्या त्यांच्या जबाबदारीविषयी, निर्णयक्षमतेविषयी बोलतात. बघूया, मुंबई मेट्रोच्या घडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या 'मेट्रो वूमन' अश्विनी भिडेंचा प्रवास या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
December 31, 2023
सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारताना गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून त्यांच्या कुठेच प्रकाशित न झालेल्या कविता ऐकणं याहून वेगळी पर्वणी काय असू शकते! माणूस अनुभव आणि त्यामुळे होणाऱ्या संस्कारांनी घडत जातो. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कवी आणि गीतकार म्हणून यश मिळवणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. पण तरीही वैभव जोशी त्यांच्या प्रवासाला खडतर म्हणत नाहीत! कवीच्या आणि कवितेच्या यशाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया वैभव जोशींसोबतच्या या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
December 3, 2023
व्हायरसपासून संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे जगाला कोव्हीडनंतर चांगलेच कळले आहे! गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कॉम्प्युटरचे व्हायरसपासून रक्षण करणारे Quick Heal कसे निर्माण झाले, त्याची सुरुवात कशी झाली व मिळालेले यश त्यांनी कसे टिकवले याविषयी Quick Heal चे संस्थापक-CEO कैलाश काटकर सांगतात. कंपनीबरोबरच आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याविषयी त्यांच्या पत्नी अनुपमा काटकर सांगतात. कॅलक्युलेटरच्या दुरुस्तीपासून ते कॉम्प्युटरच्या तंदुरुस्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास ते सांगत आहेत या व्हिडीओ पॉडकास्टमधून! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.
All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.
We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.
While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at [email protected] for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.
By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.